जनतेज न्युज

दुचाकी स्वराची बस चालकास मारहाण गाडीची काच ही फोडली

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरातील 80 फुटी रोडवर बस समोर असलेल्या दुचाकी स्वार गाडी चालकास गाडी पुढे घेण्यास सांगितले असता त्याने वाद घालून बस चालकाला मारहाण केली शिवाय बसवर दगडफेक करत काच देखील फोडण्याचा प्रकार आज दुपारच्या सुमारास धुळे शहरात घडला.या सर्व घटनेबाबत एसटी चालक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चोपडा आगाराची MH 13 CU 8415 चोपडा ते नाशिक बस घेऊन चालक सचिन पाटील व वाहक राकेश पाटील हे आज धुळ्यात आले होते, दुपारच्या सुमारास त्यांची बस 80 फुटी रोड जवळील नटराज टाकीच्या पुढे जात असताना अचानक समोर दुचाकीस्वाराला त्याला गाडी पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन त्याने बस चालक शिवीगाळ केली तसेच इतकेच नव्हे तर वाद इतका विकोपाला गेला की त्याने बसच्या पुढे दुचाकी आडवी लावून चालकाचा दरवाजा उघडून त्याला बस खाली खेचले तसेच शिवीगाळ करीत त्याला बेदम मारहाण केली, दुचाकीस्वार एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही तर त्याने दगड मारून बसची काच फोडून प्रवाशांना देखील शिवीगाळ केली. यानंतर गर्दी जमा झाल्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वाहक यांनी तक्रार दाखल केली आहे व पुढील तपास पोलिस करीत आहे.