प्रतिनिधी , देशी दारू दुकान बंद करा अशी मागणी करत महिलांनी जिळधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. धर्माबाद तालुक्यातील नायगाव(ध) या गावातील महिलांनी हे आंदोलन केलं. शाळा आणि मंदिर परिसरात थाटण्यात आलेलं दुकान हे नियमबाह्य आहे असा दावा या महिलांनी केला आहे. त्याचा वाईट परिणाम शाळेतील विध्यार्थ्यांवर देखील होत आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नायगाव हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे. त्यामुळे धर्माबाद तालुका तसेच तेलंगणातून दारू पिण्यासाठी येथे लोक येतात. याठिकाणी मद्यपानानंतर अनेक वेळा भांडण होतात. त्यासोबतच घरातील कर्ते पुरुष देखील दारू पिऊन घरात भांडण करतात अश्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महिलांनी निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
