जनतेज न्युज

नंदुरबार च्या शेतकऱ्याची केला अनोखा प्रयोग .देशी दारूचा केला कीटक नाशक म्हणून प्रयोग …

प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा मिर्ची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला ,परंतु आता मिर्ची पिकावर विषारीजन्य घुबडा आजार आल्याने नंदुरबार जिल्हातील मिर्ची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे .महागडी कीटक नाशके फवारून झालेत सर्व उपाय झालेत मात्र मिरची वरील विषाणूजन्य रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील शेतकरी नी यावर वेगळा उपाय शोधला आहे .
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून वातावरनात होणाऱ्या बदलांमुळे मिरचीवर विविध विषाणू जन्य आजार येत असल्याने उत्पनात मोठ्या प्रमाणात घट येतांना दिसत आहे . यावर्षी हि नंदुरबार जिल्ह्यात मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे .शेतकऱ्यांनी हजारों रुपये खर्च करून महागडे कीटक नाशकांची फवारणी केली मात्र फायदा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते .
परंतु नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढवली ती म्हणजे कीटक नाशक म्हणून दारू फवारणी ..दारू हि अनेकांचा संसार उध्वस्त करते मात्र दारूचा चांगला उपयोग ही होऊ शकतो हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे नंदुरबार तालुक्यातील सुरपा वळवी या शेतकऱ्याने त्याचा १२ एकरावरील मिरची वर आलेल्या विषाणूजन्य रोगामुळे मिरची चे पिक उध्वस्त झाले होते .मात्र मिरची पिकावर दारू हि दवा म्हणून वापरली आणि तिचे सकरात्मक परिमाण दिसून आले असून त्यांची मिरचीची उत्पादन वाढताना दिसत आहे .पैशा खर्च करून उपयोग होत नसल्याने त्यांनी मिरची पिकावर देशीदारू फवारणी चा प्रयोग करण्यास सुरवात केली आणि त्यांच्या पिकात सुधारणा झाल्याचा दिसून आले आहे . आपल्या मिरची पिकावर देशी दारू व ताकची फवारणी करत आहे त्यामुळे विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे तसेच उत्पन्न हि वाढले आहे .एका पंचीवीस लिटर च्या फवारणी पंप मध्ये एक बाटली म्हणजे १८० मिलीलीटर दारूचे मिश्रण टाकतात.
दारू हि अपायकारक असते तिच्या मुळे अनेकांचे संसार उद्वस्त झाले ,मात्र दारूचा दवा म्हणून उपयोग केला तर चांगल हि घडते ….याचे उत्तम उदाहरण उमरदे येथील सुरपा वळवी या शेतकऱ्याने मिरची वर देशी दारूचा फवारणी करून उत्पन्न चांगले मिळत दाखवून दिले आहे..