प्रतिनिधी , नागपूर : वेगवेगळ्या पदावरच्या, विविध औद्योगिक संस्थांमधल्या जवळपास एक लाख नोकऱ्यासाठी ऑनलाइन पद्धतीने राज्य शासनामार्फत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 12 व 13 डिसेंबरला उमेदवारांची निवड करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी, ऑनलाइन नोंद करणे आवश्यक आहे. ही नोंद मोफत असून रोजगार महास्वयम वेबपोर्टलवर सहज करता येणारी आहे. याचा लाभ घेऊन राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या रोजगार संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर येथील सहाय्यक आयुक्त प्र.ग.हरडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
