प्रतिनिधी , नंदुरबार: सातपुडा ग्रीन व्हॅली एग्रीकल्चर प्रोडूसर कंपनी तळोदा व भारती फाउंडेशन यांच्यातर्फे पर्यावरणाची संरक्षण करणे व जंगलाची वाढ करणे यासाठी बांबू रोप वाटप व विविध प्रकारचे फळझाडे वाटप कार्यक्रम तळोदा तालुक्यातील झिरी पाठडी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी जिल्हा परिषदेचे,जी.प सदस्य सुहास नाईक ,माजी सभापती शिवराम वळवी, सातपुडा ग्रीन वेली एग्रीकल्चर चे संचालक योगिता वळवी, निशा वळवी ,रोहिदास पाडवी ,सुमन वळवी ,धर्मेंद्र वळवी, राजकुमार पाडवी, सुरेंद्र वळवी, सुरेश इंद्रजीत आदी उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. पद्ममाकर वळवी यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षण करणे व जंगलाची वाढ करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे . नंदुरबार जिल्हा हा वातावरण बदल ( ग्लोबल वार्मिनग ) यात संवेदनशील जिल्हा म्हणून घोषीत झाला आहे.अनेक वर्षापासुन सातपुडा पर्वतीय क्षेत्राच्या आधारे आपल्या भागातील पाऊस समाधाणकारक पडत होता.आपल्याला कधीही पाणी टंचीई व दुष्काळाचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे नव्हती .परंतु आता झाडे मोठ्या प्रमाणात तोडले जात असल्यामुळे पाऊस वेळेवर पडत नाही . आदिवासी भागात जल , जंगल , जमीन संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.आदिवासी संस्कृती व परंपरा निसर्गाच्या निगडीत आहे . आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहभागातुन तळोदा तालुक्याने सतत या कार्यक्रमात उत्साहने सहभाग दिला आहे . सुमारे २० वर्षांपासून आपण जंगल वाढीसाठी व संवर्धना साठी रोपांची निर्मीती करणे , नर्सरी बनविने , जंगल वनस्पतीचे बि – बियाणे गोळा करणे व गरजु व उत्साही लोकांना वाटप करणे त्यातून मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने झाडांची लागवड केली आहे . ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे . त्यातून लोकांना रोजगार निर्मान , अर्थसहाय्य , शेतीचे संरक्षण व संवर्धन झाले आहे.शेतीपूरकउद्योग म्हणून शेतकऱ्याना फायदा होत आहे . हाच उपक्रम आम्ही आपल्या साक्षीने व आपल्या सहभागाने पुढे नेत आहोत . सातपुडा परिसरातील नंदुरबार जिल्हात व शेजारील भागात बांबू व इतर रोपांची लागवड करण्याचे ठरविले तरी नदी , नाल्याच्या काठावर , पाडीत जमीनीत , शेतीच्या बांधावर शेतकरी , युवक विद्यार्थी , महिला , महिला बचतगटांचे कार्यकर्ते व सर्वांनी या वृक्षारोपन चळवळीत सहभाग घ्यावा व आपला सातपुडा परीसर हिरवागार करूया .झाडे लावणे हे जगण्याचे साधन आहे .विविध फळझाडे लावणे ,बांबू लावणे यातून जंगल निर्मिती करणे यामुळे नैसर्गिक विकास होणार व सातपुड्यातील आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.कोकणात आज जी दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे तो मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल केल्या मुळे झाली आहे भविष्यात आपल्या भागात, सातपुड्यातील परिसरात अशी घटना घडायला नको त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावून निसर्ग वाचवला पाहिजे असे ऍड पद्ममाकर वळवी यांनी सांगितले ….
