प्रतिनिधी , पुणे : राज्यात पुढील दोन दिवस पाऊस (Heavy rain) पडणार आहे. उद्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज, 13 ऑक्टोबरला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
15 ऑक्टोबरला कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
