जनतेज न्युज

प्रखर राष्ट्रभक्त काली पुत्र कालीचरण महाराज यांची राजाबाजार येथील संस्थान गणपती देवस्थानाला भेट

प्रतिनिधी , औरंगाबाद : आज रविवार एक ऑगस्ट रोजी संस्थान गणपती संस्थान राजा बाजार औरंगाबाद यांनी माहिती दिली की प्रखर देशभक्त काली पुत्र कालीचरण महाराज यांनी शनिवार 31 जुलै रोजी रात्री अकरा वाजता गणपती स्थानाला भेट दिली यावेळी हिंदू संघटनेचे शेकडो कार्यकर्ते हजर होते,
नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे कलीपुत्र कालीचरण महाराज हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आले आहेत शनिवारी 31 जुलै च्या रात्रीला संस्थान गणपती मंदिरात त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठा जमाव जमा झाला होता विविध हिंदू संघटनेचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी हजर होते माध्यमांशी बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की भाषावाद जातीयवाद सोडून हिंदू धर्म हिंदू धर्माला वाचवा आता राम मंदिर आले आहे पंतप्रधान यांनी नवीन आणलेले कायदे चांगले असून यामुळे हिंदू धर्म वाढण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले
आज रविवार एक ऑगस्ट रोजी ते सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर येथील देवस्थानाला भेट देणार असून अशी माहिती भाजपाचे कार्यकर्ते कमलेश कटारिया यांनी सदरील माहिती दिली आहे,