प्रतिनिधी , सोलापूर : विज कनेक्शन तोडणी तात्काळ थाबवावे ही मागणी करत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विजमहामंडळ अधिक्षक कार्यालय गेट समोर ठिय्या मारला आहे.
वीज महामंडळाच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेची वीज तोडणी करत आहेत त्यामुळे यांचा त्रास शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला होत आहे, वीज तोडणी तात्काळ थांबवावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विजमहामंडळाचे अधिक्षक कार्यालय समोर निर्देशन करत ठिय्या आंदोलन केला आहे.
वीज महामंडळाने वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थाबविले नाही तर भविष्यात भाजपाच्या वतीने तीव्र स्वरूपाचा आदोलंन करण्यात येईल असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिला आहे.यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
