जनतेज न्युज

भाजपचे माजी आमदार रासपच्या संपर्कात

प्रतिनिधी, अकोला –  विदर्भातील भाजपचे 4 ते 5 माजी आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्या संपर्कात आहे. तर यासोबतच एका विद्यमान आमदारांचा मुलगाही जानकरांना भेटला असुन. वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यातील हे सर्व माजी आमदार संपर्कात असल्याच रासपचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष तोसिफ शेख म्हणाले आहेत. तर ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. तर ते विदर्भातील 60 मतदार संघातील लढण्याची तयारीत असल्याच हि म्हणाले आहेत.

दरम्यान, 3 माजी आमदार पश्चिम विदर्भातील असून 22 ऑक्टोंबरला रासपच्या तिकिटावर उभे दिसणार आहे. तर इतकंच नाही तर भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या नाराजांवर जानकरांचं विशेष लक्ष आहे.