जनतेज न्युज

भादोला बुलडाणा जिल्ह्यातील सैनिकांच एक गाव ; छोट्याश्या गावात सहाशे पेक्षा जास्त जण सैन्यात

प्रतिनिधी, बुलडाणा :

बुलडाणा तालुक्यातील भादोला हे जेमतेम ७ हजार लोकसंख्या आणि जवळपास बाराशे ते तेराशे घरं असलेलं छोटस गाव. Mया गावात आजपर्यंत सहाशे च्या वर सैनिकांनी सैन्याच्या विविध बटालियनमध्ये सेवा दिली आहे. यापैकी जवळपास साडे चारशे सैनिक सेवानिवृत्त झाले असून, जवळपास दीडशे आजही सैन्यात देशसेवा करत आहेत. या गावातील सर्व समाजातील तरुण सैन्यात आहेत. तर काही घरांमध्ये चार ते पाच सैनिक आहेत. देविदास लक्ष्‍मण गवई हे महार रेजिमेंट मध्ये सुभेदार मेजर, ऑर्डनरी कॅप्टन या पदावर सेवा देऊन निवृत्त झाले होते…हा गावातील सैनिकांमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा हुद्दा आहे.तर मच्छिंद्र मिसाळ काही वर्षापूर्वी सैन्यातून निवृत्त झाले आहेत, मच्छिंद्र मिसाळ यांचे दोन भाऊ आणि दोन पुतणे देखील सैन्यात होते, त्यापैकी एक आजही सैन्यात कार्यरत असून चार जण निवृत्त झालेले आहेत.
गावात एक ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून आजी-माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला, आणि गावात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण सुद्धा सैनिकांच्या हातूनच केले जाते. कोरोणाच्या दोन वर्षांमध्ये सर्व भरत्या बंद असल्यामुळे अनेक तरुणांनी सराव करून देखील त्यांना भरती होता आले नाही, मात्र अजूनही शेकडो तरुणांची सैन्य भरतीची तयारी सुरू आहे.अनेक तरुणांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न असते, तसे या गावातही आहे पण ते केवळ आणि केवळ सैनिक होण्याचे. भादोला गावातील तरुणांनी देश सेवा करण्याचे कंगनच जणू आपल्या उराशी बांधले आहे. त्यामुळे त्यांच्या ध्येयाला आणि त्यांच्या देश सेवेला मनापासून सलाम.