जनतेज न्युज

भारतीय स्टेट बँकेच्या सामाजिक सेवा विभागाच्यावतीने थर्मल स्कॅनर तसेच पल्स ऑक्सिमीटरचे वितरण

प्रतिनिधी , पुणे : कोविड १९ च्या प्रकोपापासून बचावासाठी थर्मल स्कॅनर तसेच पल्स ऑक्सिमीटरची आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या सामाजिक सेवा विभागाच्यावतीने थर्मल स्कॅनर तसेच पल्स ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात आले .

यामध्ये पुणे विमानतळावरील सी आय एस एल , पुणे आर टी ओ , पिंपरी चिंचवड आर टी ओ , सांगवी पोलीस ठाणे , लष्कर पोलीस ठाणे , जनरल लेबर कमिशनर , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व युनिटी फॉर फ्रिडम फाऊंडेशन या संस्थांना भारतीय स्टेट बँकेचे उप महाप्रबधक पी. शेषू बाबू यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले .

यावेळी पोलीस निरीक्षक अरुण हजारे , असिस्टंट कमांडंट जी जी भार्गव , असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर स्वामी अश्विनी ,संपर्क अधिकारी जयंत सिन्हा गणेश पासलकर , तानाजी शेजवळ व युनिटी फॉर फ्रिडम फाऊंडेशनचे अध्यक्ष भगवान वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे उप महाप्रबधक पी. शेषू बाबू यांनी सांगितले कि , भारतीय स्टेट बँक ” कार्पोरेट सामाजिक दायित्व ” उपक्रमाद्वारे भारतीय स्टेट बँकेच्या सामाजिक सेवा विभागाच्या माध्यमातून संपूर्ण देशात अनेक सामाजिक , शैक्षणिक , आर, आरोग्यविषयक , कृषिविकास , जलसंधारण , वृक्षारोपण , ग्रामीण आर्थिक उन्नती आदी कार्यक्रम सातत्याने राबवित असते . समाजप्रिय कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून बँक कोरोनाच्या या राष्ट्रीय आपत्तीतही अखंडित आर्थिक सेवा देण्याबरोबर मदत कार्याला देखील प्राधान्य देत आहे . सध्याच्या कोविड १९ महामारीच्या संकट काळात पुणे शहर व ग्रामीण भागातील मजुरांना अन्नधान्य व किराणा सामानाचे वितरण केले . अन्नामृत – इस्कॉनच्या साहाय्याने पुणे व पिंपरी चिंचवडमधील गरीब वस्त्यामध्ये प्रतिदिन अंदाजे २५०० गरजू लोकांना तयार अन्न सातत्याने २५ दिवस वितरित करण्यात आले . पुण्यातील तीन नामांकित सरकारी हॉस्पिटलला तीन व्हेंटीलीटर , पूना हॉस्पिटलला ४०० एन ९५ मास्क , पुणे महानगरपालिकेला १२०४ पी पी ई किटस , पुण्यातील पोलीस बांधवाना मास्क , फेसशील्ड व सॅनिटायजरचे वितरण करण्यात आले . आमच्या शाखामध्ये सुध्दा कोविड – १९ संदर्भात ग्राहकांच्या सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे . दिनांक १ जुलै या आमच्या बँक डे निमित्त पुण्यातील विविध ठिकाणी ५००० पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी स्टेट बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . या सर्व कार्यक्रमाचे समन्वय , नियोजन व संचलन संपर्क अधिकारी जयंत सिन्हा , राजभाषा प्रंबधक कृष्ण कुलकर्णी व श्रीमती शशि पाटील यांनी यशस्वी केले .