भीम आर्मी भारत एकता मिशनच्यावतीने रेल्वे खाजगीकरण , इतर सरकारी सेवा व क्षेत्रामध्ये होत असलेल्या खाजगीकरण विरोधात व खाजगी क्षेत्रामध्ये एस सी , एस टी , ओ बी सी व अल्पसंख्यांक समाजातील लोकांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी
प्रतिनिधी , पुणे : भीम आर्मी भारत एकता मिशनच्यावतीने रेल्वे खाजगीकरण , इतर सरकारी सेवा व क्षेत्रामध्ये होत असलेल्या खाजगीकरण विरोधात व खाजगी क्षेत्रामध्ये एस सी , एस टी , ओ बी सी व अल्पसंख्यांक समाजातील लोकांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निर्दर्शने करण्यात आली .
या आंदोलनातं भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सीताराम गंगावने , पुणे जिल्हा प्रमुख अमर पंडागळे , पुणे शहर प्रमुख अभिजित गायकवाड , महादेव खलगे , नागेश पवार , प्रमोद वाघमारे , अमोल माने , प्रकाश कांबळे , शरद लोखडे , अविनाश सरोदे , अक्षय पवार , श्रीकृष्ण कांबळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते .
यावेळी शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेंश देशमुख यांना निवेदन देण्यात आले .
