प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळून लाल रंगाच्या मोटरसायकल वर अज्ञात इसमाने एका महिलेला बसवून जळगांव रोड नवीन उड्डाणपुला जवळील पेट्रोल पंपाकडून जळगावच्या दिशेने पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलवर निर्जनस्थळी नेऊन अंधाऱ्यात मोटरसायकल थांबविली. यावेळी अज्ञात इसमाच्या तावडीतून महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना अज्ञात इसमाने दिनांक २२/२/२०३१ रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान महिलेस चापटा- बुक्क्यांनी जबर मारहाण केली व महिलेस खालीपाडून तिच्या मनाविरुद्ध अंगावरील कपडे फाडून अत्यंत निर्दयीपणे शारीरिक अत्याचार केला. तसेच यानंतर त्या अज्ञात इसमाने मोठा दगड उचलून महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न करीत असतांना महिलेने वार चुकविला आणि थेट भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ८२/२०२१ भादवि कलम ३६३,३७६,३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळी मा.पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,पोना किशोर महाजन, स.फै.सुनील सोनवणे,पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.
