जनतेज न्युज

महाविकास आघाडीचे सरकारही जनतेसाठी दुर्दैवीच, किरीट सोमय्यांचं जोरदार प्रत्युत्तर.

प्रतिनिधी , मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत उच्च न्यायालयाच्या निकालाला दुर्दैवी म्हणतात दुर्दैवी तर विश्वासाच्या आधारावर आलेले हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आपल्या बालहट्टाने आणि राजहट्टापाई आरे येथील मेट्रो कारशेड कांजूर येथे हलवण्याचा निर्णय मुंबईकरांसाठी दुर्देवीच ठरला आहे. कारण मुंबईकरांसाठी मेट्रोचा प्रवास आणखी लांबणीवर पडणार आहे असे जोरदार प्रत्युत्तर भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिले आहे.