जनतेज न्युज

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात चूल पेटवून आंदोलन….

प्रतिनिधी , वाशीम : दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहेत.त्याच बरोबर गॅस सिलेंडर चे दर वाढत असल्यामुळं महिलांना चुलीवर स्वंयपाक करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळं केंद्र सरकारने होत असलेली गॅसदरवाढ कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं.यावेळी केंद्र सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देत निषेध नोंदवला.यावेळी महिलांना गोवऱ्या भेट देण्यात आल्या.
जर केंद्र सरकार ने इंधन दरवाढ कमी नाही केली तर प्रत्येक पेट्रोल पंपा वरील मोदींच्या बॅनर समोर आंदोलन करण्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.