प्रतिनिधी , काही दिवसांपूर्वीच सर्व गणेश भक्तांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारी आदेशाचे पालन करत मुंबईतील सर्वच गणेश भक्तांनी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे येणाऱ्या नवरात्रोत्सवसाठी. दर वर्षी आपल्या विविध सजावटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईची माऊलीचा गाभारा कसा असणार आहे या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या काही दिवसातच मुंबईतील सर्वच देवी भक्त आपल्या माऊलीचे आगमन पार पडणार आहे. दर वर्षी आपल्या भव्य दिव्य देखाव्यासाठी मुंबईतील अनेक नवरात्रोत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत. यातलेच एक मंडळ म्हणजे मुंबईची माऊली या नावाने प्रसिद्ध असलेल्या नवतरुण मित्र मंडळ. यंदाचे हे मंडळाचे २१ वे वर्ष असून तेलंगणा येथील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकार करणार आहे. या अगोदर कैलास पर्वत, मुंबईची लोकलआणि मुंबईचा इतिहास या सारख्या विविध देखावे या मंडळाने सादर केले आहेत. अतुल फदाले आणि त्यांचे सहकारी हा संपूर्ण देखावा साकार करत आहे.
