प्रतिनिधी , पुणे : मागच्या 6 वर्षात पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रश्न सुटण्या ऐवजी वा ढवण्याचे काम झाल्याचं पदवीधरांची धारणा झाली,त्यामुळे अरुण लाड यांचा विजय झाला,असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.तसेच पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नुतून आमदार लाड यांनी प्रसंगी सरकारशी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी,असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.सांगली मध्ये आयोजित सत्कार समारंभ मध्ये ते बोलत आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघातील महा विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि विजयासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांच्या सत्कार गुरुवारी सांगली मध्ये पार पडला आहे.समस्त जैन समाज सांगली यांच्या वतीने माजी महापौर सुरेश पाटील यांनी या सत्कार सोहळाचे आयोजन केले होते.
सन्मान पत्र देऊन यावेळी उद्योजक सुभाष बेदमूथ यांच्याहस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड म्हणाले,पदवीधर निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीमध्ये भाजपाकडून मोठ्या प्रमाणात भानगडी करण्यात आल्या, मतदार नोंदणी पासून ते निवडणुकीच्या मतदाना पर्यंत भाजपाकडून सर्व उद्योग करण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासून पदवीधरांचे प्रश्न हे सुटलेले नाहीत राज्यात आणि केंद्रात त्यांची सरकार होती मात्र तरीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत,त्यामुळे भाजपाला कंटाळलेल्या मतदारसंघातल्या जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून मला विजयी केले,असे मत लाड यांनी व्यक्त केले आहे.
या समारंभात जलसंपदा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना मागच्या सहा वर्षांमध्ये पुढे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांचे प्रश्न हे सुटले नाहीत उलट वाढवण्याचे काम आजपर्यंत झाले,मात्र आता महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे नुतून आमदार अरुण लाड हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील,आणि पाठपुरावा करण्यात ते आघाडीवर असतात,असे मत स्पष्ट करत,
अरुण लाड यांनी या पुढील काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहावे,तसेच पदवीधरांच्या प्रश्नासाठी प्रसंगी त्यांनी सरकारशी संघर्ष ठेवण्याची तयारी करावी असा सल्लाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अरुण लांडे यांना यावेळी दिला.
