प्रतिनिधि , माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मला प्रश्न वेगळा विचारला होता, मी त्यावर बोलताना म्हटलं होतं की “आमच्या पक्षाचं संख्याबळ कमी आहे, मग आमचा मुख्यमंत्री होणार कसा?, असा यू-टर्न जयंत पाटलांनी घेतलाय. जयंत पाटलांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार हा प्रश्न उपस्थित का होत आहे. माझं बोलणं ट्विस्ट करून टाकलंय. चुकीची मुलाखत मोडतोय करून दाखवलीय. मी आज ट्विट करून नेमकं काय म्हणलोय ते सांगितलंय. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं विचारलं होतं. त्यावर मी स्पष्टीकरण दिलंय. अनेक वर्षे काम करतोय, आज आमचं संख्याबळ नाही, पवार साहेब आमचे अंतिम निर्णय घेत असतात हे मी सांगितलं होतं. पण वक्तव्य ट्विस्ट करून दाखवलंय, असंही जयंत पाटील म्हणालेत.
