प्रतिनिधी , मुंबई : बांगलादेश मधून बेकायदेशीररीत्या मुंबईमध्ये वास्तव करणारा रूबेन शेख हा तरुण भारतीय जनता पार्टीशी संबंधित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उत्तर मुंबई युवा संघटनेचा हा अध्यक्ष आहे. या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी, तसेच अशा माणसाला भारतीय जनता पक्षाने पद दिलेच कसे असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे. तसेच आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखिल व्हिडेओ कॉंफरन्स द्वारे या प्रकरणाची तक्रार करुन याची पुर्ण चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
