प्रतिनिधी, वर्धा : शिवसेनेमध्ये झालेल्या भूकंपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आव्हान केलं त्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली.आज वर्ध्यातील ठाकरे मार्केट येथे काही शिवसैनिकांनी एकत्रित येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली, आम्ही सगळे शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या सोबत आहोत आणि सोबत राहणार असा विश्वास या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
