जनतेज न्युज

मुलाचा हव्यासा पोटी स्वत:च्या पत्नीला डांबू रात्रभर बेदम मारहाण-पत्नीचा मृत्यू…

प्रतिनिधी , बीड : मुलाचा हव्यासा पोटी स्वत:च्या पत्नीला डांबू रात्रभर बेदम मारहाण केल्याने अति रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील औरंगपुर शिवारात घडली या घटनेने संताप व्यक्त होत असून मुलाचा हव्यास करणार्‍या नराधम नवर्‍याविरोधात बीड ग्रामीण पोलीसात कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नराधम आरोपीला पोलीसांनी अटक केली असून आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे
10 वर्षापुर्वी पैठण येथील राधा हिचा विवाह गेवराईत तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य झाले. मात्र दुर्दैवाने आठ वर्षाच्या मुलाचा आजाराने दोन वर्षापुर्वी मृत्यू झाला मुलाच्या मृत्यू नंतर वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल असा तगादा महादेव आपली पत्नी राधा हिच्याकडे लावत होता. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने राधालाही मुलबाळ होणार नव्हते हे तिला माहित असल्याने ती नवर्‍याला म्हणायची आपण शस्त्रक्रिया पलटुन घेवू, परवा दिवशी त्याचे ऑपरेशन करण्यासाठी ते दोघे बीडच्या एका खासगी दवाखान्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासून ३० हजार रूपयाचा खर्च सांगितला होता. ३० हजाराचा खर्च सांगताच महादेवचा पारा चढला अन् तितेच त्याने बायकोला शिवीगाळ करत ऑपरेशन करूनही तुला लेकरू झालं नाही तर मी काय करू? पैसे ही जातेल म्हणून आता मी दुसरं लग्न करतो असे म्हणून तिच्यावर ओरडू लागला. घरी आल्यानंतरही राधाला त्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात मयत राधाचा भाऊ सुनिल राधाकिसन बांगडे रा.चित्तेगाव ता.पैठण यांच्या फिर्यादीवरून ३०२ चा गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असे पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले.