प्रतिनिधी , नागपूर : शहराच्या सौंदर्यात चार चांद लावणाऱ्या वर्धा मार्गावरील मेट्रोच्या डबल डेकर पुलाच अखेर लोकार्पण होणार आहे, देशातील एकमेव असलेल्या पुलाच्या सगळ्यात वर मेट्रो धावणार असून त्याखालच्या लेयर मधून वाहतूक होणार आहे तर ग्राउंड फ्लोवर वरून हेवी वाहनांची वाहतूक होणार आहे, नागपूर शहराच्या मध्य भागातून जाणार नॅशनल हायवे वर नेहमी होणारी वाहतुकीची समस्या सुटणार आहे, या पुलाच्या बांधकामकरिता 381 कोटी रुपये NHI ने दिले असून गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून देखील याला पाहिलं जातं आहे, सोबतच मनीष नगर ROB च उदघाटन देखील या वेळी केलं जाणार आहे
