दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय .सर्वांनाची दिवाळी खरेदीची लगबग सुरु झाली आहे .गेली 8 महिने कोरोनाने सर्व उद्योग धंदे हळु हळु सूरु झाले आहेत .मात्र रस्त्यावर राहून उपजीविका करणाऱ्या कुटूंबाला दिवाळी साजरी करता यावी यासाठी पुण्यातील तरुणाई पुढे आली आहे .नदीपत्रात अनेक कुटुंब रहातात त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हॅपी डोंनर ग्रुप ने महिलांना साडी व फराळ वाटप केलं आहे गेली तीन वर्षे हा ग्रुप वंचीत लोकांनासाठी काम करत असल्याचं सोनम पाटील यांनी सांगितलं असा उपक्रम प्रत्येकांनी केला तर वंचित लोकांची दिवाळी गोड होईल यासाठी सर्वांनी पुढे यावं या उपक्रमाच अनुकरण जर युवकांनी केलं तर वंचितांची दिवाळी गोड होईल
