जनतेज न्युज

राजस्थानमधील पोलीस ठाण्यातून पळून आलेला आणि गेल्या 15 ते 16 महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात गुंड पपला गुर्जर याला अखेर कोल्हापुरात अटक

प्रतिनिधी , कोल्हापूर : राजस्थानमधील पोलीस ठाण्यातून पळून आलेला आणि गेल्या 15 ते 16 महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात गुंड पपला गुर्जर याला अखेर कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी मोठ्या शिताफीने पपला गुर्जर याला अटक केली असून कोल्हापूर पोलिसांची सुद्धा या कारवाईमध्ये मोठी मदत झाली आहे. दरम्यान, राजस्थान पोलीस मोठ्या तयारीने कोल्हापूरात आले होते. शिवाय सर्वजण सतर्क होते, असेही कोल्हापूर पोलिसांनी म्हंटले आहे.
पोलिसांची प्रतिक्रियासाताऱ्याच्या जिया शिकलगारला अटक -कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये पपला गुर्जर गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. संपूर्ण भारतातील पोलीस ज्याच्या शोधात होते. त्या पपलाला राजस्थान पोलिसांनी सरनोबतवाडीमधून 28 जानेवारी रोजी मध्यरात्री अटक केली. पपलासोबत त्याच्या मैत्रीणीलासुद्धा पोलिसांना अटक केली आहे. जिया शिकालगार असे या तरुणीचे नाव असून ती सातारा जिल्ह्यातील असल्याचेही समोर आले आहे. एका जिममध्ये जिया आणि पपला याची ओळख झाल्याची माहिती मिळाली असून गेल्या महिनाभरापासून जिया कोल्हापूरात येत होती, अशी माहिती सुद्धा सारनोबतवाडी येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.ईआरटी कमांडोची सुद्धा राजस्थान पोलिसांनी घेतली मदत -पपला हा कोल्हापूरात आश्रय घेऊन असल्याबाबतची राजस्थान पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेऊन त्याला पकडण्याची तयारी सुरू केली होती. यावेळी पपला ज्या सारनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये राहायला होता. त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. शिवाय हा संपूर्ण परिसर पोलिसांनी चारही बाजूंनी घेरला होता. यामध्ये ईआरटी कमांडो यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. त्यानुसार 28 जानेवारी रोजी मध्यरात्री ही कारवाई करून पपला गुर्जर आणि तिची मैत्रीण जिया शिकालगार हिला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे.