प्रतिनिधी, अकोला : राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातुन करत आहे. ते अकोल्यातील विश्रामगृह मध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणी कांग्रेस कार्यकर्ते भ्रष्ट परिवाराच्या बचावासाठी आंदोलन करतं आहेत असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रक काढुन केला होता. हा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे. ज्याचा काही व्यवहारच झाला नाही, कोणालाही लाभांश मिळालेला नाही त्याची चौकशी कसली केली जाते व कोणत्या न्यायालयाचे दाखले देता असा सवाल उपस्थित करत गांधी कुटुंबाला ईडीची पाठवलेली नोटीस ही केवळ राजकीय सूडबुद्धीने पाठवलेली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केले आहे.
