प्रतिनिधी , अमरावती : राज्यातील ग्रामरोजगार सेवकाच्या मागण्या गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असल्याने अजून पर्यंत शासनाने मानधन, रोजगार सेवकांच्या भत्ता यासह इतर मागण्या संदर्भात दुर्लक्ष केल्याने आज तिवसा पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना अमरावती जिल्हा यांच्यावतीने बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील रोजगार हमी योजना कामाकरिता नियुक्त कार्यरत ग्राम रोजगार सेवक यांना शासनाकडून शासन निर्णयाप्रमाणे मानधन मिळतात तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांचे मानधन एप्रिल 2020 ते आतापर्यंत शासनाकडे थकीत असल्याने उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे त्यामुळे शासनाने रोजगार सेवकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता सर्व मागण्या मान्य कराव्या
अन्यथा हे आमरण उपोषण असेच चालू राहील असा पवित्रा यावेळी उपोषण करते ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष निस्ताने, व तालुका कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर मते यांनी घेतला.
