प्रतिनिधी , मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यांतील विद्यार्थी, कामगार, मजूर, यात्रेकरू व इतर नागरिक आणि राज्यातील दुसऱ्या शहर / गावांमध्ये अडकलेले विद्यार्थी , कामगार, मजूर व यात्रेकरू आणि इतर लोकांना त्यांच्या राज्यात-गावात परतण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
या सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था कोरोनाची लागण व विलगीकरणाचे निकष कसोशीने पाळून राज्यांना करायची आहे. ही व्यवस्था करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रात नियुक्त करण्यात आलेल्या सक्षम प्राधिकारी / जिल्हाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
