जनतेज न्युज

लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचा तहसील कार्यलयलयावर मोर्चा .

प्रतिनिधी , ठाणे: लॉकडाऊन काळात भरमसाठ बिलं पाठवल्यानंतर महावितरणकडून बिले कमी करत नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात भाजप मनसे आरपीआयकडून आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज कल्याण तहसील कार्यलयावर देखील वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आरपीआय (आंबेडकर गटातर्फे ) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय संघटक सुनील खांबे यांनी नेतृत्व केले. यावेळी तहसील कार्यलया बाहेर घोषणाबाजी करत वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत निवेदन सादर करत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी करत सदर निवेदन सरकारपर्यंत पोहचवण्याची मागणी केली.