प्रतिनिधी , नांदेड : मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने लोकशाहिर काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे. यासाठी विविध मागण्यासाठी दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी. मंगळवारी सकाळी १०:०० वाजता पांसुन .मुखेड तहसिल कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.यह आझादी झुटी है, देश की जनता भुकी है. चे जोरदार नारे देत हे आंदोलन चालू आहे.यात प्रमुख मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ चालु करुन महामंडळ बचाव समिती स्थापन करण्यात यावी.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे.,१ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी शासकीय सुटटी जाहिर करावी,क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करावे,क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक संगमवाडी पुणे. येथे उभारण्यात यावे,मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब, क,ड, नुसार वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे,बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापन करावी, भूमिहीन लोकांना गायरान जमीन गायरान धारकाच्या नावे करावे,दिल्ली येथे शेतकरी राजाच्या मोर्चाला जाहिर पाठींबा देत या प्रमुख मागण्या करण्यात आले होते.
