जनतेज न्युज

वरणगाव च्या महात्मा गांधी विद्यालयांमध्ये शिवजयंती साजरी

प्रतिनिधी, भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर हे होते.

आज रयतेचे राजे शिवछत्रपती महाराजांची जयंती या जयंतीनिमित्त सर्व प्रशाला आणि महाविद्यालयांना शासकीय सुटी घोषित करण्यात आली आहे तरीसुद्धा शिवाजी महाराजांवरील प्रेम ,आदर व्यक्त करण्यासाठी महात्मा गांधी विद्यालयांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येत शिवछत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला