प्रतिनिधी , ठाणे- – ठाण्यातील वागळे इस्टेट मधील किसन नगर – पडवळ नगर या विभागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाला अखेर 2021 मध्ये यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या वागळे इस्टेट मधील नागरिकांना दिलासा मिळाला असून या पादचारी पुलाचे कामांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे शुभारंभ करण्यात आल्याने किसन नगर आणि पडवळ नगर या विभागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. किसन नगर – पडवळ नगर विभागाला जोडणार हा पूल 1986 साली अस्तित्वात आला. परंतु खूप वेळा नादुरुस्त होऊन पादचारी पुलावर दुर्घटना घडत होत्या. जुन्या पुलावरून दररोज 10 ते 12 हजार नागरिकांची ये -जा करत असतात, प्रामुख्याने या विभागात शाळा, महाविद्यालयले आणि बाजारपेठ असल्याने सततची वर्दळ या ठिकाणी असते.
जुन्या विस्कळीत पडलेल्या पुलावर अनेकवेळा अपघात देखील झाले होते. सुरवातीच्या काळात अनेक नगरसेवकांनी याचा पाठपुरावा केला होता, त्यानंतर नगरसेवक राम रेपाळे यांनी हे काम तडीस लावले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपल्या वचनाम्यात आश्वासन दिले होते. दरम्यान 2021 मध्ये या पुलाची निर्मिती झाली असून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा पादचारी पूल खुला करण्यात आला.
हा परिसर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येत असून मतदारांना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे अशी भावना नगरसेवक राम रेपाळे यांनी व्यक्त केली. शिवसेना केलेल्या या कामाचे कौतुक सर्वांनीच केले आहे. या उदघाटन प्रसंगी महापौर नरेश म्हस्के,स्थानिक नगरसेवक राम रेपाळे,प्रकाश शिंदे, एकता भोईर,योगेश जानकर,दीपक वेदकर आदी जण उपस्थित होते.
