प्रथिनिधी, नागपूर : विदर्भवादी लोकांकडून आज नागपूरच्या व्हेरायटी चौकात महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आला विदर्भ राज्य आंदोलन समिती जय विदर्भ पार्टी आणि विदर्भवादी संघटनांनी एकत्रित येत हे आंदोलन केलं देशात सध्या महागाई दिवसागणिक वाढत असून सामान्य जनता या महागाई खाली भरडली जात आहे सरकारला सामान्य जनतेशी काही घेणे देणे नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे सिलेंडर पेट्रोल इंधन चे दर दररोज आकाशाला भिडत आहेत त्यामुळे प्रतीकात्मक पद्धतीने सिलेंडरची अंतयात्रा काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली महागाईच्या विरोधात स्लोगन लिहिलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते सरकारने महागाई कमी करून जनतेला दिलासा देण्याची मागणी आजच्या या आंदोलनात विदर्भवादी कडून करण्यात आली.
