जनतेज न्युज

विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा ; पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

प्रतिनिधी, नागपूर : विदर्भात मानसून अगदी वेळेवर दाखल झाला होता. मात्र,त्यानंतर या १५ दिवसांमध्ये कुठेही मुसळधार किव्हा अतिमुसळधार पाऊस व्हावा यासाठी आवश्यक परिस्थिती बंगालच्या उप सागरात तयार झाली नाही,त्यामुळे विदर्भात गेल्या सरासरीपेक्षा तब्बल ३९ टक्के पाऊस कमी झाला असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. अधे-मधे विदर्भातील काही भागात तुरळक पावसाची नोंद होतं असली तरी अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही.बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याशिवाय विदर्भात सर्वदूर पाऊसाची शक्यता नाही. मानसूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांमध्ये एकदाही बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही, त्यामुळे विदर्भात पावसाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या शिवाय हवेची दिशा देखीलवारंवार विस्कळीत होतं असल्याने पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे. मलेशिया, बर्मा या भागातून समुद्री वादळ आल्यास बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यामुळे सुद्धा विदर्भात पाऊस पडण्यास मदत मिळेल अशी माहिती मोहनलाल साहू यांनी दिली आहे.
जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज
जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस होतो अशी शक्यता असते,त्यामुळे या महिन्यात बंगालच्या खाडीत किमान दोन ते तीन वेळा कमी दाबाचे पट्टे (लो प्रेशर एरिया) तयार झाल्यास जून महिन्यातील पावसाचा अनुशेष भरून निघेल. मात्र,पुढील काही दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल असे कोणताही सिस्टीम तयार होईल अशी शक्यता दिसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
अकोला जिल्हात 105 मिलिमीटर पाऊस झाला आहे,त्यानुसार अकोल्यात 27 टक्के कमी पाऊसाची नोंद झाली आहे तर अमरावती मध्ये आत्तापर्यंत केवळ 91 मिलिमीटर इतका पाऊस झाला असल्याने इथे देखील 39 टक्के कमी पाऊसाची नोंद आहे. भंडारा मध्ये 41 टक्के कमी पाऊस झाला तर बुलढण्यात ही टक्केवारी 24 टक्यांवर आहे. चंद्रपूर मध्ये आत्तापर्यंत 121 मिलिमीटर पाऊस झाला असून इथे देखील 36 टक्के कमी पाऊस पडला आहे. याशिवाय गडचिरोली येथे 117 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून तब्बल 47 टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वर्धा मध्ये सुद्धा हीच परिस्थिती असून सामान्यपेक्षा 47 टक्के पाऊस कमी झाला आहे. गोंदिया मध्ये 30 टक्यांनी पाऊस झाला असून नागपुरात हे प्रमाण 31 टक्के इतके आहे. विदर्भात सर्वात कमी पाऊस हा यवतमाळ जिल्ह्यात झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 51 टक्के कमी पावसाची नोंद आहे.