जनतेज न्युज

वैद्यनाथ मंदिर परिसर पणत्यांनी उजळून निघाला; आपल्या लाडक्या नेत्या पंकजा मुंडे यांना महिला कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा

प्रतिनिधी , बीड :भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस, आणि हाच वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी न करता “एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ” या उपक्रमाचं आवाहन केलं होतं, आणि यालाच प्रतिसाद देत परळीत प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पणत्या लावून आपल्या लाडक्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परळीत या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आणि हीच परिस्थिती पूर्वपदावर येऊन या ठिकाणच्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आलीय. दरम्यान यावेळी परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पणत्या लावल्यानं मंदिर परिसर उजळून निघाला होता.