जनतेज न्युज

शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

प्रतिनिधी , लातूर : लातूर जिल्ह्यातील सुपुत्राला सीयाचीन सीमेवर गस्त घालत असताना वीरमरण आलंय. सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक गाडी खोल दरीत कोसळून लातूर जिल्ह्यातील उमरगा हाडगा येथील जवान नागनाथ अभंग लोभे वय 35 वर्ष हे शहीद झाले आहे . आज त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. नागनाथ अभंग लोभे सियाचीन सीमेवर २० डिसेंबर रोजी बीएसएफ च्या गाडीत गस्त घालत होते… त्यांच्यासोबत इतरही ०४ जवानही होते. मात्र त्यांच्या गाडीचा तोल ढासळून ती एका खोल दरीत पडली. त्यात नागनाथ अभंग लोभे यांच्यासहीत सर्व जवानांना अपघाती वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे. सदरील जवानाचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांचे मुळ गाव उमरगा हडगा इथे आज आणण्यात आले संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहे यावेळी संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आमदार अभिमन्यू पवार यांच्या सह परिसरातील अनेक नागरिक शहीद नागनाथ लोभे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते