जनतेज न्युज

शासन व समाज व्यवस्थेने वंचित ठेवलेला सिल्लोड तालुक्यातील फासे पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.याचा ग्राउंड रिपोर्ट.

प्रतिनिधी , औरंगाबाद : तसं पहिला तर भटक्या-विमुक्त जातीतील फासे-पारधी समाज कायमचे भटके जीवन जगणारा, पाली व बेड्यावर वास्तव्य करणारा समाज. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासे-पारधी समाजाकडे बघितले जाते. सिल्लो ड शहरासह तालुक्यात सुमारे चारशे लोकसंख्या असून तालुक्यातील जिवरग टाकळी परिसरातील या समाजाकडे ना रहायला हक्क्चे घर आहे ना जमिनी आहेत. शेकडो वर्षा पासून साजमिज, शैक्षणिक, आर्थिक विकासापासून कोसोदूर असलेला या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना आहेत इथ मात्र आधार, लाईट बिल, जन्म मृत्यू दाखला, राशन कार्डच्या अभावी हा समाज विविध शासकीय योजना पासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. ज्याना रहायला स्वताचे घर नाही, दोन फुटाची जागा नाही अशा समाजाला मात्र मेहरबान सरकारने मात्र केशरी रंगाचे राशन कार्ड दिले असून यांना द्वारे आम्हाला योग्य प्रकारे धान्य मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
फासेपारधी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्यामुळे ही जमात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अठरा विश्व दारिद्रय, भीषण आर्थिक दैनावस्था, गरीबी, दारिद्रयात व गुन्हेगारी प्रवृत्तीत खितपत पडलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
पोटाच्या खळगी भरण्यासाठी शासन स्तरावर या समाजाला गायरान जमिनी कसायला देणे गरजेचे असून या मुळे या समाजाच्या पोटा पानाचा प्रश्न मिटू शकतो त्याचा बरोबर विविध शासकीय योजना प्रभावी राबविल्या तर त्याचे जीवनमन उंचावण्यास मदत ठरेल. यात मात्र शकय नाही.