प्रथिनिधी, अहमदनगर :
ल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयातील शिधापत्रीका ऑनलाईन करणेबाबतचे कामकाज पूर्णपणे बंद असल्याने दिव्यांगासह सर्वच नागरीकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख व सावलीचे सर्वं पदाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,
कार्याध्यक्ष मनोहर मराठे, संघटक खलील शेख, अनिल विघ्ने, भरत साळुंके, शिवाजी आहेर, सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख, शहर अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनील वाळके, सचिव गणेश तमानके,
विजय आंधळे, सुवर्णा देशमुख, महिला अध्यक्षा सोनाली चेडे, महिला शहर अध्यक्षा चंद्रकला चव्हाण, निलोफर शेख, हिरा मिसाळ यांच्यासह बहुसंख्येने दिव्यांग बांधवानी तहसिल कार्यालया समोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन तास दिव्यांग बांधव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले या दरम्यान तहसिल कार्यालयामधील अधिकारी आंदोलन कडे पूर्ण पणे कानाडोळा करत असल्याचे लक्षात आले. दिव्यांग बांधवांची व्यथा पत्रकारांनी वरीष्ठ कार्यालयातील अधिकारी यांना कल्पना दिली. त्यानंतर कार्यालयात हजर नसलेले अधिकारी प्रकट झाले.
पत्रकारांच्या या भूमिकेमुळे शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधव यांचा प्रश्न मार्गी लागला. शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई कळकुंबे यांनी आंदोलनाची दखल घेत फोनवर दिव्यांग बांधवांची चौकशी करून दिव्यांग बांधवांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शेवगाव तहसिल कार्यालयातील
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक साळुंके साहेब व लिपिक बहुरे साहेब तसेच निवडणूक विभाग नायब तहसीलदार सुसरे साहेब यांनी आंदोलन करणारे दिव्यांगांना लेखी स्वरूपात तात्पुरता स्वरूपात नीळ साहेब यांची नियुक्ती करण्यात आली असून कायमस्वरूपी कर्मचारी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सावली दिव्यांग संघटनेच्या आंदोलनास यश मिळाले आहे.
