जनतेज न्युज

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड दोन्ही आमदार खासदारांना न सांगता, आऊट ऑफ रिच आहेत

प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार सकाळपासून आऊट ऑफ रिच असल्याने बुलढाणा चे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन्ही आमदारांना एकनाथ शिंदे कडे पाठवले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या.. मात्र आता खासदारांनी दोन्ही आमदारांशी संपर्क झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.. त्यामुळे एकंदरीतच आमदारांची राजकीय पेरणी करून खासदार प्रतापराव जाधव स्वतः मात्र शेतात पेरणी करत आहेत, असं चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.. मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत दोन्ही आमदारांशी संपर्क झाला नसल्याचं खासदारांनी सांगितलंय.. बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक मानल्या जातात त्यांना सांगितल्या शिवाय ते पाऊल उचलत नाहीत.. त्यामुळे त्या संपूर्ण चर्चेला उधाण आलं होतं.. त्यावर आता प्रतापराव जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे..