जनतेज न्युज

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा बल तैनात

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या बंडखोर आमदारांच्या राजकारणात आता त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रभर विविध ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालय तसेच घरावर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात आता त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्यात आलेले आहेत  ठाण्यातील बंडखेर आमदार प्रताप सरनाईक यांच्या वसंत लेन्स येथील घराबाहे ही  बंदोबस्त करताना दिसून आले आहे.