प्रतिनिधी , औरंगाबाद : शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती ला परवानगी नाकारल्यामुळे शिवप्रेमी ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल असा इशारा मराठा समन्वयक संजय सावंत यांनी दिला.
19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती साजरी केली जाते परंतु या महाराष्ट्र सरकारमध्ये ठाकरे सरकारने शिवजयंती वर परवानगी नाकारली बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करत असताना त्याठिकाणी कोरोना होत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मुळे कसा कोरोना होतो असा सवाल मराठा समन्वयक संजय सावंत यांनी ठाकरे सरकारला केला आहे
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन केले त्यांना कोरोना झाला नाही आणि आताच कसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला होतो ठाकरे सरकार हे राजकारण करत असून येणाऱ्या काळामध्ये शिवप्रेमी या सरकारला दाखवून देणार असा इशारा मराठा समन्वयक संजय सावंत यांनी दिला
