जनतेज न्युज

शेतकरी विरोधी कायद्याची किसान सभेच्यावतीने तिवस्यात होळी..

प्रतिनिधि , अमरावती : आखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज अमरावती जिल्ह्यतील तिवसा शहराच्या कॉम्रेड रामचंद्र घंगारे भवन समोर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची होली करत निषेध आंदोलन करण्यात आले विविध किसान संघटना कृती समीती गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर लाखो शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे.केंद्र सरकारने तिन शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे मागे घ्यावे ही आंदोलनाची प्रमुख मागणी असून याच समर्थनात संपुर्ण भारतभर पडसाद उमटत आहे तेव्हा या कायद्याला विरोध करत तिवसा शहरात अखिल भारतीच किसान सभेने निषेध आंदोलन करून या कायद्याची होळी केली यावेळी किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थिती होते.