जनतेज न्युज

शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज सडण्याची वेळ ; नुकसान टाळण्यासाठी हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी, यवतमाळ : प्रतिनिधी, यवतमाळ : महागाव तालुक्यातील वाकद  येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत यंदा टरबूज पिकाची लागवड केली. उन्हाळ्यात टरबूजाला मोठ्या प्रमाणात मागणी राहते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी टरबूज शेती केली. पीक विक्रीला आले. त्यातच भाव कमी झाले. हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मागणी नसल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल सडण्याच्या मार्गावर आहे.अशातच महागाव तालुक्यातील वाकद येथील शेतकरी शेतामध्ये आक्रोश करीत राज्य सरकारने या पिकाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.