जनतेज न्युज

शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग… लाखोंचे नुकसान…

प्रतिनिधी , चिखली तालुक्यातील अमोना येथील सुभाष भांदर्गे यांच्या सहा एकरातील शेतातील सोयाबीनच्या दोन गंजीला आग लागल्याची घटना मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती भांदर्गे यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.