प्रतिनिधी, सोलापूर : शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या पालखीच आगमन आज सोलापूर शहरात झालं आहे.
आणि सोलापूरकरांनी अतिशय आनंदी वातावरनामध्ये गुलाबपुष्पवृष्टी करून या पालखी सोहळ्याच स्वागत केल आहे.
सोलापूर शहरात पालखी दाखल होताच सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत स्वागत या पालखीच करण्यात आल.
गजानन महाराज पालखीच हे ५३ वं वर्ष असून कोरोनामुळे मागचे दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीला मुकावं लागलं होत.
सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचा आज आणि उद्या असे दोन दिवस मुक्काम असणार आहे.
त्यामुळे सोलापूर मधील वारकरी भाविकांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
