जनतेज न्युज

सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल – सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी , चंद्रपूर : संजय राऊत सत्तांतर होईल, असे म्हणत आहेत  त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल, असे प्रत्युत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आघाडी सरकार लवकर जाईल, असे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा हेच संजय राऊत म्हणायचे की, भाजपवाले जोतिषी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? मग आता राऊत जोतिषी झाले काय, असा प्रतिप्रश्न करीत मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना आता दोन तृतीयांश संपलेली आहे आणि उर्वरित लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत.विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात केलेल्या मदतीच्या मागणीसंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकार सर्व मदत करीत आहे.