जनतेज न्युज

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँच पुण्यात दाखल

प्रतिनिधी, पुणे : मुंबई क्राईम ब्रँचची टीम पुण्यात दाखल.
महाकाल कडून सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत चौकशीसाठी मुंबईहून अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत.
मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात सौरव महाकाळची चौकशी करत आहेत.
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवला याच्या हत्येत सौरव महाकाळ चे नाव समोर आले आहे.
सौरव महाकाळला काल पुणे ग्रामीण पोलिसांनी मंचर येथे झालेल्या हत्याकांडात अटक केली.
सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे यांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलीस, दिल्ली स्पेशल सेल पोलिसांची एक टीम आणि आयबी चे काही अधिकारी देखील पुण्यात दाखल झाले आहे.