जनतेज न्युज

सलून व्यवसायिक विजबिल माफीसाठी आक्रमक सोमवार पासून राज्यभर आंदोलन करणार

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करणार

प्रतिनिधी , लॉक डाऊन च्या काळात सतत सहा महिने विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना कोणतीही मदत राज्य सरकारने केली नाहीसोमवार पासून राज्यभर वीज बीलमाफी व विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे नाभिक समाज नेते सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितलेलॉकडाऊनच्या काळात दुकाने व घरे बंद असताना भरमसाठ लाईट बिल आलीच कशी असा संतप्त सवाल व्यवसायिक व सामान्य जनता विचारत आहेघरे व दुकाने बंद असताना लाईट बिल येणे म्हणजे मीटर मध्ये गडबड करून खूप मोठा भ्रष्टाचार होतोय की काय असा सवाल उपस्थित होत आहेमहावितरण या कंपनीचा सध्याचा स्थिर आकार हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहेसध्याचा स्थिर आकार म्हणजे पूर्वीचे महिन्यांचे लाईट बिल होते असे सलून अँन्ड पार्लर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितले आहे