प्रतिनिधी , महेश कातुरे : सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.अखंड जग आणि सामान्य माणूस या कोरोना च्या काळात आर्थिक अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांची वाढीव वीज बिले माफ झालीच पाहिजेत. तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळाची च पाहिजे ,तसेच लॉक डाउन काळातील महिला बचत गटाचे कर्ज व व्याज माफ करण्यात यावे.शेतकऱ्यांना प्रति लिटर २७-२८ रु दुधाचा भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली .तसेच नागरिकांची घरपट्टी व पाणी पट्टी देखील माफ करावी असे आंदोलन कर्त्यांनी म्हटले आहे..
