जनतेज न्युज

सामान्य नागरिकांमध्ये तेलंगणा एन्काऊंटर आनंदाणे साजरा

प्रतिनिधी : शुक्रवार सकाळी 7:30 ला तेलंगणा येथील डॉ प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कार आणि खून अशा दुहेरी गुन्ह्यातील चारही आरोपी यांच्या एन्काऊंटर ची ब्रेकिंग न्यूज संपूर्ण देशात पसरली. संबंधीत पोलीस अधिकारी यांनी गुन्हा झालेल्या ठिकाणी आरोपींना संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी घेऊन गेले असता, आरोपींकडून पळून जाण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचबरोबर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. परंतु पोलिसांना आपल्या कर्तव्याचा भाग आणि स्वसौरक्षण साठी आरोपींवर एनकाउंटर करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पोलिसांनी स्वसौरक्षण आणि आपले कर्तव्य बजावण्या साठी जरी हा निर्णय घ्यावा लागला तरी नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले कारण यातून डॉ प्रियांका रेड्डी यांना श्रद्धांजली मिळाली. दुर्दैवाने मागील कोपरडी, दिल्ली येथे झालेले बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार अजून ही जिवंत आहे. दिल्ली चे निर्भया प्रकरण 7 वर्ष झाले तरी गुन्हेगार न्यायदेवते च्या सिस्टिम चा आधार घेऊन जिवंत आहेत. असे उदाहरण असताना तेलंगणा पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. अनेक ठिकाणी फटाकडे फोडून आनंद साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते आणि एक प्रायव्हेट कंपनीत कार्यरत इंजिनीयर ओम करे यांनी भोसरी येथील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला. “ज्या पदतीने या आरोपींचा एन्काऊंटर झाला त्याबद्दल आम्हाला पोलीस विभागावर विश्वास आहेच पण या निर्णयामुळे हे चार आरोपी या जगात नाहीत आणि हा डॉ प्रियांका रेड्डी यांना मिळालेला देवाने दिलेला न्याय आहे आणि तो आनंद आम्ही साजरा करतोय, पण खाकी वर्दीतील भाऊ आणि वडील असणारे पोलीस हे देवाच्या रूपाने येऊन हा न्याय मिळाला असे आम्हाला वाटते”, असे ओम करे म्हणाले