प्रतिनिधि , ठाणे : आज सावित्री बाई फुले यांची 190 वी जयंती आहे,सावित्री बाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा येथील नायगाव येथे झाला, आणि 1840 मध्येअवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर झालं, त्या वेळी त्या शिकलेल्या नव्हत्या, ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिकवले आणि त्याच सावित्रीबाईंनी देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून गौरव प्राप्त केला, त्या वेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती त्यांना वाचन लेखन करण्यास मनाई होती, ही पद्धत मोडण्यासाठी ज्योतिबा फुले आणि सावित्री बाईंनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली, भारतात मुलींसाठी सुरु होणारी ही पहिली महिला शाळा होती,सावित्रीबाई फुले ह्या थोर समाजसेवक होत्या त्यांनी विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता विधवांचे पुनर्विवाह सुरु केले अशा या महान स्त्रीला आदरांजली वाहण्यासाठी ठाणे काँग्रेस ब्लॉक क्रमांक 8 चे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महिलांना सुमारे 1000 ब्लॅंकेटच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता ,या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व इतर पदाधिक ारी उपस्थित होते त्या वेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमा साठी एम डी इन्व्हेस्टमेंट चे डायरेक्ट दातार यांनी विशेष सहकार्य केले
Byte प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण
Byte आयोजित ठाणे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे
